Home क्राईम पुण्यातील सिंम्बाॅयसिस बाॅईज होस्टेलमधील युवकाच्या अंगावर अँसिड सदृष रसायन हल्ला

    पुण्यातील सिंम्बाॅयसिस बाॅईज होस्टेलमधील युवकाच्या अंगावर अँसिड सदृष रसायन हल्ला

    195
    0

    पुणे दिनांक २६ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) सिम्बॉयासिस बाॅईज होस्टेलमधील रुममध्ये झोपलेल्या युवकाच्या अंगावर अँसिड सदृष रसायन फेकल्याची धक्कादायक घटना घडली आहे.सदरची घटना ही खडकी येथील रेंजहिल्स येथील सिम्बॉयासिस बाॅईज होस्टेलमध्ये दिनांक २३ मार्च रोजी रात्रीच्या दरम्यान घडली आहे.या बाबत खडकी पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

    दरम्यान याप्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आषिशकुमार नरेंद्रकुमार दास (वय २४ रा.सिंम्बाॅसियस बाॅईज होस्टेल रेंजहिल्स खडकी पुणे) हा दिनांक २३ मार्च रोजी शनिवारी रात्रीच्या सुमारास रुममध्ये झोपला असता रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने अॅसिडसदृष रसायन प्लास्टिक मागच्या सह्मायाने अंगावर टाकले.व तो पळून गेला.दरम्यान आषिशकुमार यांच्या अंगावर प्रचंड प्रमाणावर दाह  झाला व त्याने आरडाओरडा करत बाहेर येण्याचा प्रयत्न केला.मात्र आरोपी यांनी त्यांच्या रुमची बाहेर कडी लावून पळून गेले होता.दरम्यान या प्रकरणी दास यांनी खडकी पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल केल्यानंतर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध आयपीसी कलम ३२६ अ.३४२.४४८.नुसार गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलिस आयुक्त आरती बनसोडे.व वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.दरम्यान पोलिसांनी वसतिगृहातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज ताब्यात घेतले आहे.या प्ररकणी पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक रुईकर करत आहेत.

    Previous articleमहादेव जानकर नंतर राजू शेट्टी महायुतीबरोबर जाण्याची शक्यता
    Next articleपुणे गुन्हे शाखेच्या पोलिसांची मोठी कारवाई केमिकल युक्त ताडी तयार करणारा कारखाना केला उद्ध्वस्त

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here