Home राजकीय पुण्यात आज अजित पवार गटाची म्हत्वपूर्ण बैठक जागेचा तिढा कायम

    पुण्यात आज अजित पवार गटाची म्हत्वपूर्ण बैठक जागेचा तिढा कायम

    158
    0

    पुणे दिनांक २६ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) लोकसभा निवडणूकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत.मात्र अजून महायुतीत जागा वरून तिढा कायम आहे.अजित पार यांच्या गटातून एकूण सात जागेवर मागणी आहे.त्यात सातारा जागेचा तिढा कायम असताना नाशिक जागा देखील अजित पवार गटाला पाहिजे आहे.असे एकंदरीत दिसते आहे .त्यांचे कारण देखील आता समोर आले आहे.नाशिक येथून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री व छगन भुजबळ यांच्या कार्यकर्त्यांनी आता भुजबळ यांच्या समर्थकांनी आता व्हायरल केल्या जाणाऱ्या ट्रिझरमुळे नाशिक लोकसभा मतदारसंघात नवा ट्विस्ट आला आहे.तर ही जागा शिवसेना शिंदे गटाची असून तिथे हेमंत गोडसे यांनी उमेदवारीवर दावा केला आहे. ही सर्व पार्श्वभूमीवर आज पुण्यातील बोट क्लब येथे दुपारी १२ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार यांनी सर्व मंत्री आमदार व खासदार यांना बैठकीसाठी उपस्थित रहाण्यासाठी सांगितले असून या बैठकीत अजित पवार हे नेत्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

    Previous articleऔंध येथील शासकीय रुग्णालयात सावळा गोंधळ रक्त गटाची अदलाबदली रुग्णांची प्रकृती चिंताजनक
    Next articleपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानाला घेराव घालण्याचा इशारा

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here