पुणे दिनांक २७ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यात केमिकल युक्त ताडी तयार करण्यासाठी लागणारे क्लोरल हायड्रेटचा पुरवठा करणारा कारखानाच पुणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात जाऊन मोठी कारवाई केली आहे.यात २ हजार ३०० किलो क्लोरल हायड्रेट पावडर (केमिकल) जप्त केली आहे.यात कारखान्यात केमिकल तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी उपकरणे असा एकूण ६० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दरम्यान संगमनेर तालुक्यातील या कारखान्याच्या मार्फत पुण्यातील ताडी बनविणाऱ्यांना हे केमिकल क्लोरल हायड्रेटचा पुरवठा करण्यात येत होता पुण्यातील या ताडी गुत्यावर पुणे पोलिसांनी कारवाई करण्यात आली होती.त्यावेळी या कारखान्या बाबत पुणे पोलिसांनी संगमनेर तालुक्यातील या कारखान्याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.दरम्यान या केमिकल युक्त पासून तयार केलेली ताडी पिल्यानंतर आरोग्याला अति गंभीर समस्या निर्माण होतात.व यात त्या व्यक्तीचा मृत्यू देखील होऊ शकतो दरम्यान पुणे गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या वतीने ही कारवाई करण्यात आली आहे.सदरची कारवाई ही पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशावरून करण्यात आली आहे.ह्या कारवाई नंतर पुणे गुन्हे सामाजिक सुरक्षा विभागाच्या सर्व टीमवर कारवाई बाबत कौतुकांचा वर्षाव होत आहे.