Home क्राईम लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेची पहिली यादी जाहीर एकूण १७ उमेदवारांची घोषणा

    लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेची पहिली यादी जाहीर एकूण १७ उमेदवारांची घोषणा

    154
    0

    पुणे दिनांक २७ मार्च (पोलखलनामा ऑनलाइन न्यूज टीम) उध्वव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.या बाबत राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत या संदर्भात माहिती दिली आहे.हिंदूह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेचे एकूण १७ लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत आहे.असे त्यांनी म्हटले आहे.

    दरम्यान लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना उमेदवार १) बुलढाणा.प्रा. नरेंद्र खेडेकर २) वाशिम.संजय देशमुख.३) मावळ.संजोग वाघेरे पाटील ४) सांगली.चंद्रहार पाटील ५) हिंगोली.नागेश पाटील आष्टीकर ६) संभाजीनगर.चंद्रकांत खैरे.७) धाराशिव.ओमराजे निंबाळकर ८) शिर्डी. भाऊसाहेब वाकचौरे.९) नाशिक.राजाभाऊ वाजे.१०)रायगड.अनंत गिते. ११) सिंधुदुर्ग – रत्नागिरी.विनायक राऊत.१२) ठाणे.राजन विचारे.१३) मुंबई -ईशान्य . संजय दिना पाटील.१४) मुंबई -दक्षिण.अरविंद सावंत.१५) मुंबई -वायव्य.अमोल किर्तीकर १६) परभणी.संजय जाधव.तर मुंबई दक्षिण मध्य मधून अनिल देसाई.अशी एकूण १७ उमेदवारांची यादी आज जाहीर करण्यात आली आहे.तर उर्वरित उमेदवारांची दुसरी यादी दोन दिवसांत जाहीर करण्यात येणार आहे.

    Previous articleपुणे गुन्हे शाखेच्या पोलिसांची मोठी कारवाई केमिकल युक्त ताडी तयार करणारा कारखाना केला उद्ध्वस्त
    Next articleलातूर जिल्ह्यात भूकंपाचा धक्का दोन सेकंद जमीन हादरली

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here