पुणे दिनांक २७ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) सोलापूर जिल्ह्यातील अकलूज मधील मोठं नेतृत्व मोहिते पाटील पून्हा लवकर जेष्ठ नेते शरद पवार यांच्या गटात प्रवेश करणार आहेत.दरम्यान विजयसिंह मोहिते पाटील व जयसिंह मोहिते पाटील.तसेच धैर्यशील मोहिते पाटील यांची मुंबईतील शरद पवार यांच्यात म्हत्वपूर्ण बैठक होणार आहे. नंतर या बैठकीनंतर मोहिते पाटील यांचा शरद पवार यांच्या गटात पक्षप्रवेश होणार आहे.अशी माहिती जयसिंह मोहिते पाटील यांनी दिली आहे.दरम्यान आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपात राहणार आहेत.तर अन्य सर्व मोहिते पाटील हे परिवार पुन्हा एकदा शरद पवार यांच्या गटात जाणार असल्याचे ते म्हणाले आहेत.दरम्यान आज शिरुन लोकसभा मतदारसंघाचे खासदार व जेष्ठ नेते शरद पवार यांचे विश्वासू अमोल कोल्हे यांनी अकलूज येथे भेट दिल्यानंतर ही मोठी घडामोड घडली आहे.आता माढा लोकसभा मतदारसंघात मोहिते पाटील हे तुतारी हाती घेणार का ?हे बघणे म्हत्वाचे ठरणार आहे.