Home क्राईम देशातील ६०० वकिलांनी सरन्यायाधीशांना पत्र लिहून केली चिंता व्यक्त

    देशातील ६०० वकिलांनी सरन्यायाधीशांना पत्र लिहून केली चिंता व्यक्त

    154
    0

    पुणे दिनांक २८ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) देशातील एकूण ६०० वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी .वाय. चंद्रचूड यांना पत्र लिहून देशातील न्यायपालिका बद्दल आता चिंता व्यक्त केली आहे.दरम्यान न्यायालयीन क्षेत्रात एका खास गटाचा राजकीय हस्तक्षेप वाढत असल्याचं म्हणत वकिलांनी भीती व्यक्त केली आहे.या पत्रात वकिल हरीश साळवे ‌उज्जवला पवार.मनन कुमार मिश्रा ‌.अदीश अग्रवाल.चेतन मित्तल.पिंक आनंद.हितेश जैन.उदय होल्ला आदी मान्यवर वकिलांच्या या पत्रावर स्वाक्षरी आहेत.

    दरम्यान या पत्रात म्हणण्यात आले आहे की.खासगी किंवा राजकीय कारणांसाठी न्यायालयीन प्रक्रियांमध्ये हस्तक्षेप वाढत आहे.याला आळा घालणे आवश्यक बनले आहे.त्यामुळे आम्ही सुप्रीम कोर्टाला विनंती करतो की.अशा प्रकारचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी प्रयत्न केले जावेत.आपल्या न्यायालयीन क्षेत्राचे अशा हल्ल्यांपासून संरक्षण करणे आवश्यक आहे. काही न करणे किंवा गप्प बसल्याने अशा विरोधी शक्तीची ताकद पून्हा वाढेल.ही शांत बसण्याची वेळ नाही.कारण न्यायसंस्थेवर हल्ला करण्याचा प्रयत्न गेल्या काही वर्षांपासून सुरू झाला आहे.असे देखील या पत्रात म्हटले आहे.दरम्यान न्यायदानाचे काम करणाऱ्या लोकांनी आता आपल्या न्यायसंस्थेला वाचवण्यासाठी भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. लोकशाहीचा एक स्तंभ असलेल्या आपल्या न्यायपालिकेला अधीक मजबूत करण्यासाठी आपण सर्वजण एकत्र येणे आणि याविरोधात आवाज उठवणे आवश्यक आहे.तरच न्यायपालिकेवरील हल्ले रोखता येतील असा उल्लेख या पत्रात केला आहे.दरम्यान अशा कठीण प्रसंगी तुमचे नेतृत्व म्हत्वाचे ठरु शकते.आम्हा सर्वांचा तुमच्यावर आणि सर्व न्यायमूर्तींवर विश्र्वास आहे.आम्हाला यावर मार्गदर्शन करावे आणि न्यायपालिकेला अधीक सक्षम करण्याच्या दृष्टीने पाऊल उचलावे. न्यायपालिकेचा सन्मान आणि प्रामाणिकपणा टिकवण्यासाठी आम्ही आवश्यक ते करण्यासाठी तयार आहोत.आम्ही तुमच्या नेतृत्वाकडे आशेने पाहत आहोत.असं पत्रात म्हणण्यात आलं आहे.

    Previous articleकीटकनाशक औषध पिऊन आत्महत्या करणाऱ्याचा प्रयत्न करणाऱ्या एमडीएमकेचे खासदाराचा कार्डियक अरेस्टने मृत्यू
    Next articleदिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना कोर्टाचा दिलासा

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here