Home राजकीय सुपरस्टार गोविंदा अहुजांचा शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश

  सुपरस्टार गोविंदा अहुजांचा शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश

  33
  0

  पुणे दिनांक २८ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) सुपरस्टार बाॅलिवूड अभिनेता गोविंद अहुजा यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.सदरचा पक्षप्रवेश बाळासाहेब भवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत केला आहे.गोविंदा यांना मुंबई उत्तर पश्चिम मधून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पक्षात गोविंदा यांचे स्वागत केले आहे.यावेळी पक्षप्रवेशा दरम्यान गोविंदा यांनी सांगितले की.पक्षाने दिलेली जबाबदारी मी यशस्वी रित्या पार पाडेन.विकासाचा मुद्द्यावर प्रभावित होऊन गोविंदा यांनी आपल्या सरकार मध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हणाले आहे.

  दरम्यान यावेळी बोलताना गोविंदा हे म्हणाले की मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात चांगला विकास केला आहे.त्यामुळे मी प्रभावित झालो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सारखी स्वच्छ प्रतिमा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आहे.गोविंदा हे शिवसेनेचे स्टार प्रचारक म्हणून काम करणार आहे. असे शिंदे यांनी यावेळी सांगितले आहे.त्यांनी आपल्याकडे कोणत्याही जागेची मागणी केली नाही.गोविंदा हे जयंत पाटलापेक्षा चांगले कलाकार आहे.असा टोमणा शिंदे यांनी जयंत पाटील यांना लावला आहे.शिवतारे यांनी पक्षाचा आदेश मानणार असे सांगितले आहे.व महायुतीचे ते काम करणार आहे.आमचं सरकार हे घरात बसून काम करणार नाही.असा टोला शिंदे यांनी उध्वव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांना लगावला आहे.

   

   

   

  Previous articleदिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना कोर्टाचा दिलासा
  Next articleमहाराष्ट्रातील १२० साखर कारखान्यांचा गळीत हंगाम संपला तर ८७ ठिकाणी गळीत हंगाम सुरू

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here