पुणे दिनांक २९ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील भांडगाव येथील एका रासायनिक कंपनीत विषारी वायूमुळे एका कामगाराचा मृत्यू झाला आहे.दोंघावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.सूत्रांनकडून मिळालेल्या माहितीनुसार या कंपनीत गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.
दरम्यान कंपनीत रासायनिक ऍसिडचे ड्रम पडून 🔥 आग लागली होती. दरम्यान ही आग विझवतांना अग्निशमन बंडाच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली होती.त्यावेळी कंपनीत विषारी वायू तयार झाला होता.या विषारी वायूच्या संपर्कात आल्याने एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला.तर दोघेजण गंभीर असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.हा विषारी वायू कर्मचारी यांच्या नाकातोंडात जावून त्यांना मोठ्या प्रमाणावर बाधा निर्माण झाली.यात मयत झालेल्या कामगारांचे नाव अमोल चौधरी असे आहे.तर अन्य दोन कामगार हे रुग्णालयात आयसीयू मध्ये उपचार घेत आहेत.