पुणे दिनांक १ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) शिक्षणाचे माहेरघर पुण्यात पुन्हा एकदा काळजाचा थरकाप उडविणारी घटना घडली आहे.एका युवतीवर पुन्हा एकदा कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.सदरचा हल्ला हा एकतर्फी प्रेमातून झाला आहे. परंतु वेळीच या युवतीने आरडाओरडा केल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. दरम्यान युवतीच्या आरडाओरडामुळे संबंधित कोयताधारक आरोपी हा घटनास्थळावरुन पळून गेला आहे.सदरची घटना ही खडकमाळ पोलिस स्टेशनच्या हद्दीतील ही घटना आहे.दरम्यान या घटनेनंतर पोलिसांनी 👮 आरोपीचा शोध सुरू केला आहे.
दरम्यान आज पुन्हा एकदा एकतर्फी प्रेमातून एका विद्यार्थीनीचा जीव तिच्या आरडाओरडा केल्याने वाचला आहे.पुण्यात अजून कोयता गॅगची दहशत आहे.हे आजच्या प्रकरणावरून दिसत आहे.तसेच एकतर्फी प्रेमातून अशा घटना घडत आहेत.यापूर्वी देखील पुण्यात विद्यार्थ्यांनीवर कोयत्याच्या सहाय्याने हल्ला घडल्या आहेत.दरम्यान काॅलेजच्या परिसरात या घटना घडत आहेत.मुलीने प्रेमाला नकार दिल्याने मुले रागाच्या भरात मुलींवर हल्ला करत आहेत.