Home क्राईम ससून रुग्णालयात उंदीर चावल्याने रुग्णांचा मृत्यू नातेवाईकांकडून प्रशासनावर कारवाईची मागणी

    ससून रुग्णालयात उंदीर चावल्याने रुग्णांचा मृत्यू नातेवाईकांकडून प्रशासनावर कारवाईची मागणी

    112
    0

    पुणे दिनांक २ एप्रिल ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार ससून रुग्णालयात एक खळबळजनक घटना घडली असून उंदीर चावल्याने रुग्णांचा मृत्यू झाला आहे.असा आरोप रुग्णांच्या नातेवाइकांने केला आहे.दरम्यान या घटनेनंतर आता  रुग्णांच्या नातेवाइकांनी सदर रुग्णांचा मृतदेह घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे ससून रुग्णालयात प्रशासन रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांच्या बाबतीत कसा उपचार करत आहेत.हे या उदाहरणावरून दिसून येत आहे.

    दरम्यान याप्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील रहिवासी असलेले सागर रेणूसे असे मृत्यू झालेल्या रुग्णांचे नाव आहे.यांना १६ मार्च रोजी उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.दरम्यान आयसीयु वाॅर्ड मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांना उंदीर चावला व यात त्यांचा मृत्यू झाला आहे.असा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे.व तसा अहवालच ससून रुग्णालयाच्या वतीने देण्यात आला आहे.दरम्यान या घटनेनंतर नातेवाईक यांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे.व ससून रुग्णालयातील प्रशासनाच्या वर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.

    Previous articleएसीमुळे 🔥 आग लागून चार जणांचा गुदमरून मृत्यू
    Next articleदिव्यांग अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here