पुणे दिनांक ३ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आम आदमी पार्टीचे नेते संजय सिंह यांची आजच तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे.त्यांच्या जामीन अर्जावर स्वाक्षरी झाली होती.व जामीनाचा आदेश तिहार तुरुंगात पोहोचला होता.त्यानंतर ते तुरुंगातून बाहेर आले आहेत. दरम्यान दारु घोटाळ्यात त्यांना सहा महिन्यांनी जामीन मिळाला आहे. काही वेळापूर्वी त्यांच्या सुटकेचे आदेश तुरुंगात पोहोचले होते.त्यानंतर तुरुंग प्रशासनाने औपचारिकता पूर्ण केल्यानंतर ते बाहेर आले आहेत. दरम्यान तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर संजय सिंह यांनी म्हटले की तुरुंगाची दारं तोडली जातील.व केजरीवाल.सिसोदिया.आणि सत्येंद्र जैन यांची सुटका केली जाईल.असं ते म्हणाले.दरम्यान तुरुंगातून बाहेर येताच आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं जोरदार स्वागत केले.ते आधी दिल्लीच्या मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी जाणार आहेत.