Home राजकीय खासदार भावना गवळी यांचा पत्ता कट.राजश्री पाटील यांना उमेदवारी दिल्याची चर्चा

    खासदार भावना गवळी यांचा पत्ता कट.राजश्री पाटील यांना उमेदवारी दिल्याची चर्चा

    197
    0

    पुणे दिनांक ३ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) शिवसेना मधून एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झालेल्या यवतमाळ वाशीम मतदार संघाच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांचा पत्ता कट झाल्याची माहिती सूत्रांनकडून मिळत आहे.दरम्यान हिंगोली येथून उमेदवारी रद्द केलेले हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी दिल्याचे समजते.त्यामुळे आता भावना गवळी काय करणार याकडे आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

    भावना गवळी या यापूर्वी शिवसेनेच्या वतीने यवतमाळ वाशीम मतदार संघातून सलग पाच वेळा खासदार म्हणून निवडून आल्या आहेत.दरम्यान मध्यांतरी महिला उत्कृष्ट प्रतिष्ठान ट्रस्टमध्ये घोटाळ्याप्रकरणी ईडीने खासदार भावना गवळी यांना नोटीस बजावल्या होत्या.त्या नंतर एकनाथ शिंदे यांच्या गटात त्या सहभागी झाल्या होत्या.भावना गवळी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रक्षाबंधन वेळी राखी देखील बांधली होती. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा सुरू झाल्या नंतर भावना गवळी यांनी स्वतःच्या उमेदवारी साठी तयारी व मोर्चा बांधणी सुरू केली होती.मात्र भावना गवळी यांना त्यांचे तिकीट कापले जाऊ शकते याची शंका आल्यापासून त्या मुंबईत उमेदवारी साठी तळ ठोकून होत्या.व त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली होती.

    Previous articleसोलापूर येथील टेक्सटाईल कंपनीला भीषण आग 🔥
    Next articleआम आदमी पार्टीचे नेते संजय सिंह यांची तिहार जेलमधून सुटका

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here