Home क्राईम छत्रपती संभाजीनगर मध्ये कपड्याच्या दुकानाला भीषण 🔥 आग घरामधील सात जणांचा मृत्यू

    छत्रपती संभाजीनगर मध्ये कपड्याच्या दुकानाला भीषण 🔥 आग घरामधील सात जणांचा मृत्यू

    162
    0

    पुणे दिनांक ३ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) छत्रपती संभाजीनगर येथील छावणी परिसरातील एका कपड्याच्या दुकानाला भीषण अशी आग लागल्याची घटना घडली असून या दुकानाच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या एकाच कुटुंबातील सात जणांचा या आगीत गुदमरून मृत्यू झाला आहे.दरम्यान या मृतात तीन महिला व दोन मुलांचा समावेश आहे.सदर आग ही आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे.हे कापड दुकान छावणी परिसरातील दाना बाजार गल्लीतील  महावीर जैन मंदिरा जवळील असल्याचे समजते आहे.

    दरम्यान याप्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार संभाजीनगर येथील छावणी परिसरातील दाना बाजार गल्लीतील महावीर जैन मंदिर जवळ तीन मजली इमारतीत हे कापड दुकान होते.दरम्यान आज बुधवार पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास अचानकपणे या दुकानांना आग लागली   व एकाच कुटुंबातील एकूण सात जणांचा दुर्दैवी असा मृत्यू झाला आहे. दरम्यान या आगीची घटनेनंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन सदरची आग आटोक्यात आणली.यातील सात मृतदेह हे शासकीय रुग्णालय घाटी येथे पाठविण्यात आले असून तिथे पंचनामा करण्यात येत आहे.दरम्यान या सर्व मृतदेहांवर पोस्ट मार्टम केल्यानंतर सदरचे मृतदेह हे नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

    Previous articleवाघोली येथील बिवरी गावात दरोडा 🗡️ चाकूचा धाक दाखवून सात दरोडेखोरांनी लुटला १६ लाखांचा मुद्देमाल
    Next articleतैवानमध्ये ७.२ रिश्टर स्केलचा भूकंप सेकंदात कोसळल्या इमारती जपान देखील हायमोडवर

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here