Home राजकीय नवनीत राणा बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणाचा आज होणार फैसला

  नवनीत राणा बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणाचा आज होणार फैसला

  67
  0

  पुणे दिनांक ४ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार नवनीत राणा यांच्या बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणाचा निकाल आज लागणार आहे.दरम्यान हा निकाल लागण्यापूर्वीच भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांना उमेदवारी देखील देण्यात आली आहे.त्यामुळे हा निकाल म्हत्वपूर्ण आहे.व आता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.दरम्यान खासदार नवनीत राणा यांच्या प्रमाणपत्रा बाबत शिवसेना उमेदवार  यांनी न्यायालयात आव्हान दिले होते.व हायकोर्टाने २०२१ मध्ये अवैध ठरविण्यात आले होते.

  दरम्यान त्यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेले होते.सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाच्या निकालाला स्थगिती दिली होती.व बोगस जात प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणी दोन्ही गटाचा युक्तिवाद हा २८ फेब्रुवारीलाच संपला आहे.दरम्यान सदरचा निकाल हा कोर्टांने राखून ठेवला होता.या प्रकरणाच आज अंतिम निकाल येणार आहे.हा निकाल नवनीत राणा यांच्या उमेदवारी बाबत अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे.निकालाचे वाचन हे ओपन कोर्टात होणार आहे.व नंतर हा निकाल वेबसाईटवर अपलोड करण्यात येणार आहे.आज अमरावती मध्ये लोकसभा निवडणूक अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे.त्यामुळे आज या निकालाकडे भाजप सह अनेकांचे लक्ष लागले आहे.

  Previous articleआम आदमी पार्टीचे नेते संजय सिंह यांची तिहार जेलमधून सुटका
  Next articleआय पी एल वर सट्टा लावणा-याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here