Home क्राईम चेन्नई रेल्वे स्टेशनवर ४ कोटी रुपयांची रोकड जप्त.भाजप कार्यकर्त्यांसह पोलिसांनी तीन जणांच्या...

    चेन्नई रेल्वे स्टेशनवर ४ कोटी रुपयांची रोकड जप्त.भाजप कार्यकर्त्यांसह पोलिसांनी तीन जणांच्या आवळल्या मुसक्या

    168
    0

    पुणे दिनांक ७ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार लोकसभा निवडणूक आधी चेन्नई येथील तांबरम  रेल्वे स्थानकावर एकूण ४ कोटी रुपयांच्या रोकडसह तीन जणांच्या पोलिसांनी 👮 मुसक्या आवळल्या आहेत.विषेश म्हणजे यात एक भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता यांचा या अटकेत समावेश आहे. यातील अटक तीन जण हे चार बॅगेतून ४ कोटी रुपयांची रोकड घेऊन जात होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

    दरम्यान हे तीनजण रेल्वे ट्रेनने तिरुनेलवेलीला जात होते.याचवेळी पोलिसांनी या तीन जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत.दरम्यान या सापडलेल्या रोख रक्कम बाबत आयकर विभाग आता या प्रकरणाची चौकशी करत आहे.सूत्रांनकडून मिळालेल्या माहितीनुसार यातील एकजण हा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे.व तो एका खासगी रेस्टॉरंटचा व्यवस्थापक आहे.त्याचे नाव सतिश असून तो तिरुनेलवेलीचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार नैनार नागेन्टिरन यांच्या सुचनेनुसार सदर ची रोकड घेऊन जात होता .अशी कबुली त्याने तपासा दरम्यान दिली आहे.दरम्यान या प्रकरणी तामिळनाडू फ्लाइंग स्क्वाॅडला मोठ्या प्रमाणावर रेल्वे ट्रेनने रोकड घेऊन जात असल्याची गुप्त बातमी मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी चेन्नई रेल्वे स्थानकावर शोधमोहीम सुरू केली होती.त्यावेळी रेल्वेतील एका सेकंड क्लास एसी कोच जवळ पोलिसांनी या तीन जणांना ४ कोटी रुपयांच्या रोकडसह अटक करण्यात आली. दरम्यान महामार्गावर पोलिसांनी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर वाहन तपासणी मोहीम पोलिसांनी राबविण्यात आली आहे.यातील या तीन जणांनी महामार्गावर वरुन ही रोकड न नेता ती अक्कल हुशारीने रेल्वे ट्रेनने घेऊन जात होते.परंतू ते पोलिसांच्या ताब्यात आले आहे.या कारवाई मुळे आता अनेक राजकीय नेते मंडळी यांचे धाबे दणाणले आहेत.

    Previous articleन-हे येथे मोबाईल शाॅपीचे दुकान फोडून २ लाख ६८ हजार रुपयांची चोरी
    Next articleनागपूरत सिग्नलला थांबलेली १२ वाहने ट्रकने चिराडली रुग्णवाहिकेचा चेंदामेंदा

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here