पुणे दिनांक ७ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील न-हे रोड धायरी नारायण नवले शाळे जवळील दुकान नंबर दोन येथील मोबाईल एक्सेरीज अँन्ड होलसेल हे मोबाईलचे दुकान बंद असताना अज्ञात चोरट्यांने दिनांक ६ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास दुकानाचे शटर उचकटून दुकानात प्रवेश करुन कॅश काऊंटर मधून ९ हजार रुपयांची रोकड व सॅमसंग.रियलमी .व्हिओ.इनफिनिक्स.आयपॅड.विव्हो व्ही १७ प्रो . इत्यादी कंपनीचे महागाडे मोबाईल.तसेच स्मार्ट वाॅच.पेनड्राइव्ह असा सर्व मिळून एकूण २ लाख ६८ हजार ७४२ रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला आहे.सदर चोरी प्रकरणी दुकानांचे मालक सिंतांशु साळेकर ( वय २२ रा.पर्वती पुणे) यांनी सिंहगड पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल केली असून या प्रकरणी सिंहगड पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्या विरुद्ध भा .दा.वी .कलम ४५७.व ३८० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अक्षय पाटील हे करीत आहेत.