पुणे दिनांक ८ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज) नागपूर येथे भीषण असा अपघात झाला असून मानकापूर परिसरात भरघाव वेगाने येणाऱ्या ट्रकने सिग्नलला थांबलेल्या एकूण १२ गाड्यांना धडक दिली आहे.यात एकूण ९ कार व एक रुग्णवाहिका व दोन दुचाकी असा वाहनांचा समावेश आहे.या अपघातात एकूण ४ प्रवाशी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.हा अपघात एवढा भीषण होता की.ट्रकने धडक दिल्याने एक कार चक्क दुसऱ्या कारवर जाऊन चढली आहे.
दरम्यान या अपघाताबाबत पोलिसांनी 👮 सांगितले की.नागपूरातील मानकापूर चौकात सिग्नलला वाहने थांबली होती.त्याचवेळी उड्डाणपुला वरुन भरघाव वेगाने येणाऱ्या ट्रकने या एकूण १२ वाहनांना पाठीमागून जोरात धडक दिल्याने भीषण असा अपघात झाला आहे.यात एकूण ५ ते ६ वाहनांचे प्रचंड प्रमाणावर नुकसान झाले आहे.तर रुग्णवाहिकाचा चक्काचूर झाली आहे.दरम्यान हा अपघात झाल्यानंतर येथे घटनास्थळी खूप वेळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.अशी देखील माहिती सूत्रांकडून मिळत आहे.दरम्यान या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झालेली नाही.