पुणे दिनांक ९ एप्रिल ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) काॅग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी हे लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभे साठी मध्यप्रदेश येथील शहडोल येथे पोहोचले होते.व त्यांची सभा संपल्यानंतर ते दुसऱ्या ठिकाणी सभे करीता जाणार होते.परंतू हेलिकॉप्टरचे इंधन संपल्याने ते तेथेच अडकले आहे.दरम्यान आज ते शहडोल येथून निघणार आहे.दरम्यान आज भोपाळ येथून इंधन मागविण्यात आले.व त्यानंतर ते आज निघणार आहेत.परंतू काल हेलिकॉप्टरचे इंधन संपल्याने व इंधन यायला वेळ लागणार असल्याने त्यांना रात्रभर शहडोल येथेच थांबवा लागले होते.दरम्यान काहीही असो सत्ताधारी सरकारने काॅग्रेसचे खाते लोकसभा निवडणूकाच्या पार्श्वभूमीवर सिल केल्याने काॅग्रेस पक्षाला लोकसभा निवडणूकीत प्रचार यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी पैसाच नाही.