Home क्राईम पुण्यात पहाटे प्रर्यत सुरू असणाऱ्या दोन पबवर गुन्हे शाखेची कारवाई

    पुण्यात पहाटे प्रर्यत सुरू असणाऱ्या दोन पबवर गुन्हे शाखेची कारवाई

    326
    0

    पुणे दिनांक ९ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील एलरो व युनिकाॅर्न हाऊस या दोन पबवर पुणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 👮 कारवाई केली आहे.या पबना रात्री दीड वाजेपर्यंतच परवानगी असताना हे पब बेकायदेशीर रित्या पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू असतात या पब मधील डी जेचा आवाज रोडवर येतो . व या पबच्या बाजुला असणाऱ्या सोसायटी मध्ये रहाणाऱ्या नागरिकांना देखील त्रास होतो आता अशा दोन पबवर गुन्हे शाखेच्या वतीने कारवाई करुन साउंड सिस्टीम व हुक्का पाॅट.असा मिळून दोन्ही पबमधून २८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.व पुण्यातील येरवडा पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    दरम्यान पुणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या दोन पबवर कारवाई केली आहे. दरम्यान याप्रकरणी पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रात्री दीड वाजल्यानंतर देखील एलरो.व युनिकाॅर्न हाऊस हे दोन पब सुरू होते.याची माहिती पुणे गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी १) अमन शेख.२) संदीप सहस्रबुद्धे.३) रश्मी कुमार.४) सुमित चौधरी ५) प्रफुल्ल गोरे या पाच पब मालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.व दोन्ही पब पोलिसांकडून सील करण्यात आले आहेत.

    Previous articleकाॅग्रेसचे नेते राहुल गांधींच्या हेलिकॉप्टरचे इंधन संपले
    Next articleछत्तीसगड येथे ५० फुट दरीत बस कोसळून ११ जणांचा दुर्दैवी मृत्यू

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here