Home सामाजिक राज्यभरात आज गुढीपाडव्याचा मोठा उत्सव.आजपासून नववर्षाची सुरुवात

    राज्यभरात आज गुढीपाडव्याचा मोठा उत्सव.आजपासून नववर्षाची सुरुवात

    105
    0

    पुणे दिनांक ९ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज गुढीपाडव्याचा सण घराबाहेर दरात लांब बांबूच्या काठीवर एक नवीन रेशीमी वस्त्र किंवा नवीन रेशमी साडी नि-या काढून बांधावी व रेशमी वस्त्रावर तांब्याचा कलश उपडा ठेवावा.फुलाची माळ तसेच बत्ताशांची माळ व कडुनिंबाची एक डहाळी बांधून ही काठी घराबाहेर उभारावी तिथे रांगोळी काढावी व गुढी उभरावी व गुढीला गंध-फुले वाहुन पूजा करावी व नैवेद्य दाखवावा.आज गुढीपाडव्याचा सण मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो.सकाळी लवकर उठून घरोघरी गुढी उभारली जाते.आज गुढी पाडव्याच्या सणापासून नवीन वर्षाला हिंदू नववर्षाची सुरुवात होती.म्हणून नववर्षाच्या निमित्ताने शोभा यात्रा काढण्यात येते.तसेच या गुढीपाडव्याचा मुहूर्त हा चांगला असतो म्हणून अनेकजण नवीन व्यवसायाची सुरुवात करतात.कोणी नवीन वाहन  आजच्या दिवशी घेतात कोणी आजच्या दिवशी नवीन जागा नवीन फ्लॅट घेतात

    Previous articleनागपूरत सिग्नलला थांबलेली १२ वाहने ट्रकने चिराडली रुग्णवाहिकेचा चेंदामेंदा
    Next articleकाॅग्रेसचे नेते राहुल गांधींच्या हेलिकॉप्टरचे इंधन संपले

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here