पुणे दिनांक १० एप्रिल ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) माझ्या निवडणूकीत एवढे सर्व भावंड कधीच फिरली नाहीत.आता नुसती पायाला भिंगरी लावून सर्वजण गरागरा फिरत आहेत.अरे भाऊ निवडणुकीत उभा असताना कधीच फिरला नाहीत.आता कसे काय फिरताय? आता त्यांचे हे फिरणे म्हणजे पावसाळ्यातील छत्र्या आहेत.लोकसभेला एकदा मतदान झाले की या छत्र्या पून्हा प्रदेशात हवाई सफर करायला जातील या सगळ्यांना तीच सवय आहे.मी आदाराने तोलून मापून बोलतो आहे.मला तोंड उघडायला भाग पाडलं तर फिरता येणे मुश्किल होईल.गप्प बसलोय म्हणून वळवळ करताय का ? या अगदी दादांनी कडक शब्दात कुटुंबातील इतर सदस्यांवर निशाना साधून त्यांना एक प्रकारे चांगलाच इशारा दिला आहे.
दरम्यान ते अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आजी माजी पदाधिकारी यांच्या मेळाव्यात बोलत होते.यावेळी बोलताना ते म्हणाले की जेष्ठ नेते शरद पवार यांनी सोमवारी दमबाजी खपवून घेणार नाही.असा इशारा दिला होता.त्यावर देखील अजितदादा बोलले.त्यावर दादा म्हणाले की मी दमबाजी केली तर बारामती मधील लोक मला बांबू लावतील बारामती मध्ये काही लोक केव्हीके ट्रस्ट मध्ये कामाला आहेत.त्या कामगारांना आता दमदाटी केली जात आहे.या पध्दतीने बारामती मध्ये कधी मते मागितली गेली नव्हती.पातळी सोडून हे सर्व सुरू आहे.तसेच विजय शिवतारे आता आमच्या सोबत आले आहेत.त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात अर्ज भरावा म्हणून कोणी त्यांना मध्यरात्री पर्यंत फोन केले हे त्यांनी मला दाखवून सर्वांची पोलखोल केलीय आहे.हे त्यांना माघार घेऊ नका.अर्ज दाखल करा.असे सांगत होते.हे कोणत्या पातळीचे राजकारण सुरू आहे? मी संबंधितांचे फोन बघितल्यावर मला खूप वाईट वाटले.ज्यांच्यासाठी मी रात्र न दिवस जिवाचे रान केले त्यांच्याकडून इतक्या खालच्या पातळीवरचे राजकारण केले जात असेल असे वाटले नव्हते असे यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती येथे बोलताना म्हटले आहे.