Home क्राईम पुण्यात रमझान ईदनिमित्त शहरातील वाहतुकीत बदल

    पुण्यात रमझान ईदनिमित्त शहरातील वाहतुकीत बदल

    790
    0

    पुणे दिनांक ११ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुणे शहर मध्ये आज रमझान ईदनिमित्त गोळीबार मैदान परिसरात वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहे.आज रमझान ईदनिमित्त गोळीबार मैदान येथील ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधव नमाज पठणासाठी मोठ्या संख्येने येतात.त्यामुळे या भागात आज सकाळी ६ ते नमाज पठण होईपर्यंत वाहतूक व्यवस्था मध्ये बदल करण्यात आले आहे.दरम्यान हे बदल आज सकाळी ७ ते १२ अशा वेळात रहाणार आहेत.यात प्रामुख्याने गोळीबार मैदान.हडपसर . पर्वती दर्शन.व खडकी येथील ईदगाह मैदानसह  एकूण १४१ मशिदीत नमाज पठण होणार आहे.आज गोळीबार मैदान कडून स्वारगेटकडे जाणारा रस्ता बंद राहणार आहे.प्रर्यायी मार्ग गोळीबार चौकातून डाव्या बाजूला वळून सी.डी.ओ.चौक पुढे उजव्या बाजूला वळून गिरीधर भवन चौक येथून उजव्या बाजूला वळून सेव्हन लव्हज चौकातून इच्छित स्थळी पुढे जाता येणार आहे.तसेच सेव्हन लव्हज चौकातून गोळीबार मैदानाकडे येणारी वाहतूक व्यवस्था बंद राहणार आहे.यासाठी पर्यायी मार्ग सॅलिसबरी पार्क ते सी.डी.ओ.चौक भैरोबा नाला येथून इच्छित स्थळी जाता येणार आहे.सोलापूर रोडने मम्मादेवी चौकाकडे येणा-या वाहनांना गोळीबार मैदानाकडे जाता येणार नाही.त्या वाहनांना पर्यायी मार्ग ही वाहने मम्मादेवी चौक.बिशप स्कूल मार्गे किंवा कमांड हाॅस्पीटलमार्गे वळून पुढे किंवा नेपीयर रोडने तुमच्या इच्छित स्थळी जाता येणार आहे.असे पुणे वाहतूक शाखेच्या वतीने कळविण्यात आले आहे.

    Previous articleमराठा आरक्षण संदर्भात आज उच्च न्यायालयात सुनावणी
    Next articleलोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भरारी पथकाची मोठी कारवाई.पुणे व नागपूरात लाखोंची रोकड जप्त

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here