पुणे दिनांक १२ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार पाकिस्तान येथे भाविकांची बस दरीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकूण १७ भाविकांचा मृत्यू झाला आहे.तर अन्य एकूण ३८ भाविक हे गंभीर रित्या जखमी झाले आहेत.त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.दरम्यान या दुर्घटना बाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तान येथील सिंध व बलुचिस्तान प्रांताच्या सीमावर्ती भागातील एका शहरात ही बस भाविकांना घेऊन जात असताना एका वळणावर बस चालकांचे बस वरील नियंत्रण सुटल्याने ही बसदरीत कोसळून हा भीषण अपघात झाला आहे.दरम्यान यात मृतांमध्ये सर्वजण एकाच कुटुंबातील सदस्य असल्याची माहिती आहे.