Home क्राईम मोक्का व फायरींग करुन फरार झालेल्या आरोपीच्या वानवडी पोलिसांनी आवळल्या मुसक्या

    मोक्का व फायरींग करुन फरार झालेल्या आरोपीच्या वानवडी पोलिसांनी आवळल्या मुसक्या

    455
    0

    पुणे दिनांक १२ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुणे शहर हद्दीतील वानवडी पोलिस स्टेशन मधील रेकॉर्ड वरील गुन्हेगार हा फायरींग व मोक्का या दोन गुन्ह्यात मागील १० महिन्यांन पासून फरार असलेल्या अट्टल गुन्हेगारांच्या वानवडी पोलिसांनी रामटेकडी येथील इंडस्ट्रीयल एरिया रेल्वे अंडरबायपास येथून मुसक्या आवळल्या आहेत.त्यांचे नाव अक्षय नागनाथ कांबळे ( रा.ससाणेनगर लेन नंबर १५ हडपसर पुणे) असे आहे.याच्यावर वानवडी पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा.र.रजि..नं.२५८/२०२३ भा.दा.वी.कलम.३०७ .१२० ( ब) व भारतीय हत्यार कलम ३/(२५) तसेच महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम कलम ३(१) ३(२) ३(४) मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल होता.

    दरम्यान याप्रकरणी सदरचा आरोपी बाबत वानवडी पोलिस स्टेशनचे पोलीस वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पंतगे यांनी तपास पथकास गुन्ह्यांच्या अनुषंगाने मार्गदर्शन करुन सुचेना दिल्यानंतर पोलिस हवालदार सर्फराज देशमुख यांना माहिती मिळाला की अक्षय हा रामटेकडी इंडस्ट्रीयल एरिया रेल्वे अंडरबायपास हडपसर जवळ कोणाची तरी वाट पाहत थांबला आहे.या माहिती नुसार वानवडी पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.सदरची कामगिरी ही पोलिस उपायुक्त परिमंडळ ५ आर.राजा.व सहा.पोलिस आयुक्त वानवडी विभाग गणेश इंगळे वानवडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पंतगे व पोलिस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र करणकोट यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलिस उपनिरीक्षक संतोष सोनवणे.हरिदास कदम.सर्फराज देशमुख.महेश गाढवे.अमजद पठाण.विनोद भंडलकर.अतुल गायकवाड.यतिन भोसले.गोपाल मदने.विष्णु सुतार.अमोल गायकवाड.संदीप साळवे यांनी केली आहे.

    Previous articleविद्यार्थ्याला शिक्षिकेची लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण
    Next articleसंभाजीनगर व बीड मध्ये वीज पडून तीन जणांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here