पुणे दिनांक १२ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुणे क्षिक्षणांच्या माहेर घर असलेल्या व पुण्यातील नामांकित अप्पा बळवंत चौकातील नू.म.वी.शाळेमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.एका मुलाला शिक्षिकेने चक्क लाथाबुक्क्यांनी बेदम अशी मारहाण केली आहे.दरम्यान या घटनेनंतर शिक्षिकेविरोधात विश्रामबाग पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल झाली असून संबंधित विद्यार्थ्याच्या पालकांनी या शिक्षिकेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान याप्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नू.म.वी.शाळेत ९ वीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यानी वर्गात दंगा केला होता.हे पाहून शिक्षिका चांगलीच संतापली.आणि सदरच्या शिक्षिकेने वर्गात मध्येच इतर विद्यार्थ्यांना समोर या विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी बेदम अशी मारहाण केली .