पुणे दिनांक १२ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मराठवाडा व विदर्भाला आवकही पाऊसाने चांगलेच झोडपून काढले आहे.दरम्यान संभाजीनगर मध्ये वीज पडून दोन जणांचा मृत्यू झाला आहे.यात पैठण मधील अंबड टाकळी येथे आज दुपारी शेतात काम करताना शेतकरी जावेद शेख ( वय ६०) यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा मृत्यू झाला आहे.तर दुसरी घटना सिल्लोड येथील उडणगाव शिवारात शेतात काम करताना तरुण शेतकरी सुधाकर धोंडीराम पाचे ( वय २५ ) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
दरम्यान दुसरी घटना ही बीड येथे घडली आहे.मागील दोन दिवसांपासून या भागात अवकाळी पावसाने चांगलेच थैमान घातले आहे.या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे चांगलेच नुकसान झाले आहे.यात फळबागांचे व हाती तोंडी आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे.दरम्यान शेतात काम करताना अचानकपणे वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आला यात मीना शिंदे यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा मृत्यू झाला आहे तर त्यांचा मुलगा ओंकार हा गंभीर रित्या जखमी झाला असून त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.