Home क्राईम अनैतिक संबंधांना अडथळा ठरणाऱ्याला चार चाकी गाडी खाली चिरडलं एकतर्फी प्रेमाचा शेवटचा...

  अनैतिक संबंधांना अडथळा ठरणाऱ्याला चार चाकी गाडी खाली चिरडलं एकतर्फी प्रेमाचा शेवटचा अंत

  83
  0

  पुणे दिनांक १३ एप्रिल ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथे अनैतिक संबंधांना अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून एका युवकाच्या अंगावर चार चाकी गाडी घालून भरदिवसा हत्या केल्याची घटना समोर आली आहे.या घटनेनंतर नारायण गाव येथे एकच खळबळ उडाली आहे.या प्रकरणी नारायणगाव पोलिस यांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे.दरम्यान या हत्याचे घटनास्थळाचे सी सी टिव्ही फुटेज देखील समोर आले आहे.हत्या झालेल्या युवकांचे नाव साबीर मोहम्मद शफी असं आहे.याच्या हत्या प्रकरणी पोलिसांनी अभिजित सोनावणे (वय २८) व त्याची मैत्रीण जेबा इरफान फकीर (वय ३२) यांना ताब्यात घेतले आहे.

  दरम्यान याप्रकरणी पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार यात हत्या झालेल्या साबीर हा जेबा हिच्या घराशेजारी रहात होता.साबीर यांचे जेबा हिच्यावर एकतर्फी प्रेम होते .ते जुन्नर येथे रहातात जेबा ही कांदळी येथील वसाहतीत कामाला होती.दरम्यान जुन्नर ते कांदळी प्रवासा दरम्यान तिची अभिजित बरोबर ओळख झाली तो शेतजमीन मोजणीचे काम करतो.नंतर त्या दोघांमध्ये प्रेमसंबंध झाले.याची माहिती साबीर याला समजल्या नंतर अभिजित व साबीर या दोघांमध्ये भांडण झाले होते. रमझान सणाच्या निमित्ताने अभिजित हा जेबाच्या घरी आला होता.त्या वेळी साबीर याने अभिजित याला हटकले व तु इथे का आलास असा जाब त्यांने अभिजित याला विचारला? यावेळी पुन्हा दोघां मध्ये वाद झाला.दरम्यान दुसऱ्या दिवशी जेबा ही कामासाठी निघाली असता साबीर याने तिचा पाठलाग केला.ही जेबाने अभिजित याला दिली दरम्यान दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास शुक्रवारी साबीर हा पुणे ते नाशिक महामार्गावर एका हाॅटेल जवळ उभा होता.अभिजित यांने त्याला पाहून त्यांच्या अंगावर चार चाकी गाडी घातली व त्याला चिरडलं यात साबीर यांचा मृत्यू झाला.घटनास्थळावरुन अभिजित हा फरार झाला.दरम्यान या घटनेनंतर पोलिसांनी पिंपळवाडी येथून अभिजित याला ताब्यात घेतले व त्याची मैत्रीण जेबा हिला देखील ताब्यात घेतले आहे.दरम्यान या गुन्ह्याची कबुली दिली आहे.दोंघांनी आपसात संगनमत करून हा गुन्हा केला आहे.असे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.अशी माहिती नारायण गाव पोलिसांनी दिली आहे.या प्रकरणी पुढील तपास पोलिस करीत आहेत.

  Previous articleमहाराष्ट्रातील या जिल्ह्यांना यलो अलर्ट.नागपूरात तुफान अवकाळी पाऊस
  Next articleनवजात बाळाची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश पुण्यातील प्रसिद्ध हाॅस्पीटलची नर्सचा सहभाग एकूण सहा महिला गजाआड

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here