पुणे दिनांक १३ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्यावर हल्ला झाला आहे.या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे.जगन मोहन रेड्डी हे आज विजयवाडा येथे एका प्रचार यात्रे करीता गेले होते.या प्रचार यात्रे दरम्यान त्यांच्यावर दगडफेक झाली आहे.या दगडफेकीत त्यांच्या डोक्याला मार लागला आहे.व त्यात ते जखमी झाले आहेत.ते प्रचार यात्रेत लोकांना संबोधित करत असतांनाच हा हल्ला झाला आहे.दरम्यान या हल्ल्याची दृश्ये मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.’टिडीपी गट मुख्यमंत्र्यांच्या रोड शो मध्ये मोठ्या संख्येने सहभागी झालेले लोक बघू शकले नाहीत म्हणून त्यांच्यावर हल्ला केला.’ असा आरोप यावेळी वायसीपी नेत्यांनी केला आहे.