पुणे दिनांक १३ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पिंपरी चिंचवड शहरातील वाकड पोलिस स्टेशन हद्दीत जगताप डेरी चौकात पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नवजात बाळाच्या विक्री व खरेदीचा व्यवहार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे.दरम्यान यात पुण्यातील एका प्रसिद्ध हाॅस्पीटलमध्ये काम करणाऱ्या नर्सचा सहभाग आहे.पोलिसांनी एक सात दिवसांचे नवजात बालकासह नर्ससह एकूण सहा महिलांना अटक केली आहे.दरम्यान ही टोळी मागील २ ते ३ वर्षांपासून हा व्यवसाय करत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.अद्याप या टोळीने एकूण सहा नवजात बाळाची विक्री केली असून त्याचा शोध वाकड पोलिस घेत आहेत.
दरम्यान याप्रकरणी पिंपरी चिंचवड शहर सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले की.पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या पोलिसांना माहिती मिळाली की वाकड येथील जगताप डेरी चौकात पुण्यातील एका प्रसिद्ध हाॅस्पीटलमधून एका नर्सच्या मदतीने बाळाची खरेदी विक्री करीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी 👮 सदर ठिकाणी छापेमारी केली असता एका रिक्षात काही महिला व सात दिवसांचे नवजात शिशू मिळाले.यात ज्या दांपत्यांना वंध्यत्वाची समस्या आहे.अशा दांपत्यांची माहिती नर्स या टोळीतील महिलांना देत होती.अशा दांपत्यांना ५ ते ७ लाख रुपयांना नवजात बालक विकत देण्याचे आमिष दाखवून हा व्यवहार चालत होता.या टोळीतील महिला आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणारे दांपत्य शोधायचे ज्या गरीब महिलांना दोन पेक्षा जास्त मुले आहेत.व त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे.अशा दाम्पत्यांना पैशाचे आमिष दाखवून या टोळीतील महिला गरजवंत दांपत्याना नवजात बाळ विकत होते.या प्रकरणी सध्या वाकड पोलिसांनी एकूण सहा महिलांना अटक केली असून त्यांच्या विरोधात वाकड पोलिस स्टेशन मध्ये भादवी ३७०(३) व (४) नुसार गुन्हा दाखल केला आहे.तसेच या टोळीतील महिलांनी एकूण सहा नवजात बाळाची विक्री केली असून ज्या दांपत्यांनी या टोळीतील महिलांकडून नवजात बालकांची बेकायदेशीर रित्या खरेदी केली आहे.अशा दांपत्यावरही पोलिस कठोर कारवाई करणार आहेत.दरम्यान पोलिस तपासात ही टोळी मागील २ते ३ वर्षांपासून हा नवजात बाळ विक्री होत आहे.असे निष्पन्न झाले आहे.