पुणे दिनांक १३ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील हायफाय एरिया कल्याणीनगर येथील ‘एलोरा’ व युनिकाॅर्न ‘ या पबवर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली होती व हे दोन्ही पब सील केले होते.आता या दोन्ही पबवर आज पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या वतीने हातोडा 🔨 चालवत अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त केले आहे.दरम्यान पुणे पोलिसांच्या वतीने या पबचे बेकायदेशीर बांधकाम पाडण्यासाठी पुणे महापालिकेला पत्र दिले होते . पुणे पोलिसांनी पत्रव्यवाहार करुन देखील महानगरपालिका बांधकाम विभाग जाणूनबुजून या बेकायदेशीर पबवर कारवाई करण्याचे टाळत होते.मात्र पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी या पबवर कारवाई करण्या संदर्भात कडक भूमिका घेतल्याने या पबवर महापालिकेला अखेर कारवाई करावी लागली आहे.
दरम्यान कल्याणीनगर येथील ‘एलोरा व युनिकाॅर्न ‘ हे पब पुणे पोलिसांनी दिलेल्या वेळेपेक्षा म्हणजे रात्री दीड नंतर देखील पहाटे पर्यंत बेकायदेशीर रित्या सुरू ठेवण्याचा प्रयत्न होत होता.पोलिसांनी दिलेल्या वेळेचे उल्लंघन केले जात होते.या पबचा येथील नागरिकांना त्रास होत होता.या बाबत रहिवासी यांनी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे लेखी तक्रार केली होती.नंतर पोलिस आयुक्त यांच्या आदेशावरून गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने दिनांक ८ एप्रिल रोजी या पबवर कारवाई करुन बेकायदा हुक्क्यासह एकूण २९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.या पबच्या मालकांवर गुन्हा दाखल करुन हे दोन्ही पब सील केले होते.