पुणे दिनांक १३ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) रविवार दिनांक १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असल्यामुळे समाजातील सर्व स्तरातील नागरिक हे मोठ्या संख्येने पुणे शहरात मिरवणुकीने व वेगवेगळ्या वाहनांमधून येतात.जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान पुणे स्टेशन येथील पुतळा तसेच अरोरा टाॅवर चौकातील पुतळा तसेच विश्रांतवाडी चौक ते कळस फाटा.व कळस फाटा ते विश्रांतवाडी चौक परिसरात येत असतात यावेळी मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर रोडच्या दोन्ही गर्दी होऊ नये म्हणून व वाहन चालकांची गैरसोय होऊ नये व वाहतूक व्यवस्था सुरळीतपणे चालण्या करिता वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त रोहिदास पवार वाहतूक व्यवस्थेत बदल केले आहे.या बदला मध्ये पोलिस वाहन फायर ब्रिगेड व रुग्णवाहिका या वाहनांन व्यतिरिक्त अन्य सर्व खासगी वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.
दरम्यान दिनांक १४ एप्रिल रविवारी पासून हे बदल असणार आहेत शाहिर अमर शेख चौकाकडून मालधक्का चौकाकडे जाणारी वाहने शाहिर अमर शेख चौकातून वळविण्यात येत आहे.पर्यायी मार्ग शाहिर अमर शेख चौकातून मालधक्का चौकाकडे जाणारी वाहने आरटीओ चौक व जहांगीर चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.जीपीओ चौक येथून बोल्हाई चौकाकडे जाणारी वाहतूक जीपीओ चौकातून वळविण्यात येत आहे.पर्यायी मार्ग जीपीओ चौकातून बोल्हाई/ मालधक्का चौकाकडे जाणारी वाहतूक किराड चौक व नेहरु मेमोरियल चौक मार्गे इच्छित स्थळी पुढे जातील पुणे स्टेशन चौकातून चौकातून मालधक्का चौकाकडे जाणारी वाहतूक पुणे स्टेशन चौकातून वळविण्यात येणार आहे.पर्यायी मार्ग पुणे स्टेशन ते अलंकार चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.नरपतगिरी चौकातून मालधक्का चौकाकडे जाणारी वाहतूक नरपतगिरी चौकात वळविण्यात येत आहे.पर्यायी मार्ग नरपतगिरी चौक ते पंधरा ऑगस्ट चौक ते कमला नेहरू रुग्णालया पवळे चौक कुंभारवेस चौक मार्गे इच्छित स्थळी पुढे जातील.बॅनर्जी चौकाकडून शाहिर अमर शेख चौकाकडे जाणारी वाहतूक बॅनर्जी चौकातून वळविण्यात येत आहे.पर्यायी मार्ग बॅनर्जी चौकातून पाॅवर हाऊस चौक नरपतगिरी चौक पंधरा ऑगस्ट चौक कमला नेहरू रुग्णालया पवळे चौक.कुंभारवेस चौकातून इच्छित स्थळी पुढे जातील दरम्यान ससून हॉस्पिटल येथील अत्यावश्यक रुग्णांसाठी मार्ग ससून हॉस्पिटल येथील डेड हाऊस शेजारच्या गेटने प्रवेश देण्यात येत आहे.
दरम्यान अरोरा टाॅवर येथील डॉ कोयाजी रोड वरुन सिल्व्हर जुबली मोटर्स चौकाकडे जाणारी वाहतूक तीन तोफा चौक येथे वळविण्यात येणार आहे. पर्यायी मार्ग डॉ कोयाजी रोड ते तीन तोफा चौक ते एस बी आय हाऊस मार्ग इच्छित स्थळी पुढे जातील.ईस्काॅन मंदिर चौकाकडून डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा अरोरा टाॅवरकडे जाणारी वाहतूक इस्कॉन मंदिर चौकातून वळविण्यात येत आहे.पर्यायी मार्ग डॉ कोयाजी रोड तीन तोफा चौक एस बी आय हाऊस चौक मार्गे इच्छित स्थळी पुढे जातील नेहरुचौका कडून तीन तोफ चौकाकडे जाणारी वाहतूक नेहरू चौकातून वळविण्यात आली आहे.पर्यायी मार्ग नेहरू चौकातून किराड चौक.ब्ल्यु नाईल चौक एस बी आय हाऊस.मार्गे इच्छित स्थळी पुढे जातील.नाझ चौक महात्मा गांधी रोड वरुन नाझ चौकातून अरोरा टाॅवरकडे जाणारी वाहतूक नाझ चौकातून वळविण्यात येत आहे.पर्यायी मार्ग नाझ चौक डावीकडे वळून बाटली वाला बगिचा मार्गे इच्छित स्थळी पुढे जातील. स्वारगेट वरुन सिंहगड रोडला जाणारी वाहतूक सावरकर चौक ते थोरले बाजीराव पेशवे पथ सणस मैदान पथ काॅर्नर ते कल्पना हाॅटेल चौक ते ना.सी फडके ते मांगीरबाबा चौक ते सेनादत्त पोलिस चौकी ते बालशिवाजी चौक ते आशा हाॅटेल चौकातून सिंहगड रोडने पुढे जाता येईल.दरम्यान सिंहगड रोड वरुन स्वारगेट कडे जाणारी वाहतूक आशा हाॅटेल चौकातून डावीकडे वळून ते बालशिवाजी चौक ते सेनादत्त पोलिस चौकी चौक ते मांगीरबाबबा चौक ते ना.सी.फडके ते कल्पना हाॅटेल ते सणस पुतळा चौक इच्छित स्थळी पुढे जातील.शास्त्रीरोडकडून येणारी वाहतूक सेनादत्त चौकाकडून येणारी वाहने डावीकडे मांगीरबाबा चौका कडून ना.सी.फडके चौकाकडे पुढे इच्छित स्थळी जातील.
दरम्यान विश्रांतवाडी चौकातून एअरपोर्ट टिंगरेनगरकडे जाणारी वाहने ही या पर्यायी मार्ग विश्रांतवाडी चौकातून एअरपोर्ट टिंगरेनगरकडे जाणाऱ्या वाहनांना मेंटल काॅर्नर चौकातून उजवीकडे वळून काॅमर्स झोन चौकातून उजवीकडे वळून टिंगरेनगर एअरपोर्ट रोडकडे जातील तसेच मेंटल काॅर्नर चौकातून उजवीकडे पोस्ट ऑफिस चौकातून डावीकडे वळून एअरपोर्ट रोडकडे जातील.दरम्यान विश्रांतवाडी चौकातून बोपखेल दिघी भोसरी व आंळदीकडे जाणारी वाहने फक्त दुचाकी वाहने विश्रांतवाडी चौकातून बोपखेल दिघी भोसरी आंळदीकडे जाणारी दुचाकी वाहने शांतीनगर चौकातून डावीकडे वळून पुढे १०० मीटर अंतरावर वळून पर्यायी मार्ग चव्हाण चाळ सरळ मच्छीमार्केट पर्यंत सरळ जाऊन डावीकडे वळून कळस फाटा येथे येऊन बोपखेल मार्ग आळंदी रोडला मिळतील या दुचाकी व्यतिरिक्त अन्य रिक्षा चारचाकी व अवजड वाहनांना मेंटल काॅर्नर चौकाच्या पुढे जाण्यासाठी बंदी आहे.विश्रांतवाडी चौकातून बोपखेल दिघी भोसरी आंळदीकडे जाणारी रिक्षा कार व जड वाहने विश्रांतवाडी चौकातून बोपखेल दिघी.भोसरी.आंळदीकडे जाणारी रिक्षा व कार जड वाहने ही चंद्रमा चौकातून होळकर ब्रिजमार्गे सरळ खडकी मार्गे पुढं जातील.वरील प्रमाणे डाॅ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त दिनांक १३ रोजी सायंकाळी सात वाजल्यापासून ते दिनांक १४ एप्रिल रोजी रात्रीच्या दोन वाजेपर्यंत तसेच दिनांक १४ एप्रिल रोजी ४ ते ९ वाजेपर्यंत आवश्यकतेनुसार बदल करण्यात येतील असे वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त रोहिदास पवार यांनी कळविले आहे.