पुणे दिनांक १४ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) लोकसभा निवडणुकीसाठी ४०० पारचा नारा दिलेल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकाळ मध्ये कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून याचाच प्रत्यय रविवारी पहाटे मुंबईकरांना आला आहे.बाॅलीवूड अभिनेता सलमान खान यांच्या वांद्रे येथील निवासस्थानी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास गोळीबार झाला.या घटनेनंतर राज्यातील सर्वच विरोधी पक्षातील नेत्यांनी राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर रित्या बनला आहे.असे म्हणून चांगलेच धारेवर धरले आहे.यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार व नेत्या सुप्रिया सुळे यांनी देखील या गोळीबार संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान “काही दिवसांपूर्वी पोलिस स्टेशन मध्येच सत्तेत असणां-या सत्ताधारी आमदारांनी पोलिस स्टेशन मध्येच गोळीबार केला होता.जर पोलिस स्टेशन मध्येच गोळीबार होत असेल तर रोडवर गोळीबार म्हणजे सत्तेतील लोकांना काही वाटणार नाही.कारण ‘ अब की बार गोळीबार सरकार ‘ म्हणावे लागेल.आकडेवारीच याला पुरावा आहे.” असे देखील खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.दरम्याण सलमान खान यांच्या निवासस्थानी गोळीबारात एकूण तीन राऊंड फायर करण्यात आले आहे.यातील दुचाकी वरील हल्लेखोर हे सी सी टिव्ही कॅमेरा 📷 मध्ये कैद झालेले आहेत.
दरम्यान यावेळी बोलताना त्या पुढे म्हणाल्या की सुसंस्कृत पुण्यात कोयता गॅग शब्दही माहिती नव्हता आज पुण्यात कोयता गॅग खुलेआम फिरते. त्याचा सोक्षमोक्ष का लावला जात नाही? आता हे लोण काॅलेज पर्यंत पोहोचले आहे. महाराष्ट्रातील ट्रिपल इंजिन सरकार मध्ये याला कोणाचातरी आशीर्वाद असावा.असा आरोप त्यांनी केला आहे.दरम्यान महाराष्ट्रांतील ट्रिपल इंजिन सरकार मधील नेत्यांचा गुन्हेगारीला आशीर्वाद आहे.त्यामुळेच महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढली आहे.हे गृहमंत्री यांचे अपयश आहे.भारतीय जनता पार्टीचे खासदार आम्हाला संविधान बदलायचे आहे.असं बोलले होते.एक प्रकारे त्यांच्या पोटातलं ओठांवर आलं असून या सरकारला संविधान बदलायचं आहे.त्यासाठी त्यांनी ४०० पार्कची घोषणा दिली आहे.असे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.