Home क्राईम एम बी बी एसचे अॅडमिशनच्या नावा खाली साठ वर्षीय नागरिकाची ६९ लाखांची...

  एम बी बी एसचे अॅडमिशनच्या नावा खाली साठ वर्षीय नागरिकाची ६९ लाखांची फसवणूक

  244
  0

  पुणे दिनांक १४ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील अलका टॉकीज जवळील भारती भवन व भारती विद्यापीठ परिसरात कसबा पेठ येथे रहाणाऱ्या ६० वर्षीय वृध्दास त्यांच्या मुलांचे एम बी बी एसला अॅडमिशन करुन देतो असे सांगून त्यांचा विश्र्वास संपादन करून वेगवेगळ्या कारणांसाठी त्यांच्या बॅक खात्यातील ऑनलाइन बँकिंग द्वारे ५८ लाख ७९ हजार ७५२ रुपये तर रोकड स्वरूपात १० लाख ९० हजार ९९० रुपये असे एकूण ६९ लाख ७० हजार ७४२ रुपये घेऊन त्यांच्या मुलांचे एम बी बी एसला अॅडमिशन न करता त्यांची फसवणूक केली आहे.व अज्ञात व्यक्तीने त्यांच्या बँक खात्याचा कोरा चेक दिल्याने विश्र्वास संपादन झाल्यावर अॅडमिशन साठी एवढी मोठी रक्कम कसबा पेठ येथे रहाणाऱ्या ६० वर्षीय वृद्धाने या ठगास एवढी रक्कम दिली होती.सदरच्या फसवणूक प्रकरणी विश्रामबाग पोलिस स्टेशन मध्ये वृद्ध नागरिक यांनी फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी 👮 अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा रजिस्टर क्रमांक ७३/२०२४ भादावी कलम ४०६ व ४२० नुसार गुन्हा दाखल केला आहे.सदर फसवणूक प्रकरणी सहा.पोलिस निरीक्षक निंबाळकर हे करीत आहेत.

  Previous article‘अब की बार गोळीबार सरकार ‘खासदार सुप्रिया सुळे यांचा भाजपावर निक्षाणा
  Next articleट्रक कारच्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here