पुणे दिनांक १४ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील उपनगर कात्रज येथे काल रात्रीच्या सुमारास एक दुर्दैवी अशी घटना घडली आहे.कात्रज भागातील राजस सोसायटी येथील चौकात जवळ सुरू असलेल्या फनफेअरमध्ये वीजेचा शाॅक लागून एक ९ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दिनांक १३ एप्रिल रोजी रात्री उशिरा घडली आहे.दरम्यान या दुर्दैवी अशा घटनेनंतर या भागात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान या अपघाताबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कात्रज येथील राजस सोसायटीच्या भागातील चौकाजवळ लहान मुलांन खेळण्या करीता फनफेअर पार्क आहे.दरम्यान येथे करमणूकी साठी पाळणे मिकी माऊस अशी साधने आहेत.लहान मुलांना प्रवेश फी घेऊन लहान मुले या पार्क मध्ये खेळण्यासाठी येतात असाच एक ९ वर्षांचा मुलगा हा येथील पार्क येथे खेळत होता पार्क मधील पाळण्यात बसण्याकरीता लोखंडी पायरी वरून चढताना त्याला अचानकपणे वीजेचा शाॅक लागून मुलगा बेशुद्ध पडला त्यानंतर त्याला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल असून पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.