Home क्राईम पुणे -नाशिक महामार्गावर आज पहाटे लक्झरी बसला भीषण अपघात बस उड्डाणपूलावरुन खाली...

  पुणे -नाशिक महामार्गावर आज पहाटे लक्झरी बसला भीषण अपघात बस उड्डाणपूलावरुन खाली कोसळली

  444
  0

  पुणे दिनांक १४ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) खासगी कंपनीची ट्रॅव्हल्स बस पुण्यावरून नाशिकला जात असताना पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास या बसला भीषण असा अपघात झाला आहे.ही बस उड्डाण पूलावरुन खाली कोसळली या अपघातात १५ ते २० प्रवासी गंभीर रित्या जखमी झाले आहेत.अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.सदरचा अपघात हा सिन्नर जवळील गोंदे फाट्याजवळ झाला आहे.अपघाता नंतर पोलिसांनी व स्थानिक नागरिकांनी या अपघातग्रस्त बस मधील प्रवाशांना बस मधून बाहेर काढून तातडीने उपचारासाठी रूग्णांलयात दाखल करण्यात आले आहे.जखमी प्रवाशांनवर सध्या उपचार सुरू आहेत.

  दरम्यान या अपघाताबाबत प्रथमदर्शनी मिळालेल्या माहितीनुसार सदरची खासगी ट्रॅव्हल्स कंपनीची बस पुण्यावरून नाशिकला जात असताना बसच्या चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने ही बस सिन्नर जवळील गोंदे फाट्याजवळील उड्डाण पूलावरुन खाली कोसळून हा अपघात झाला आहे.

  Previous articleकात्रज येथे फनफेअरमध्ये खेळताना वीजेचा शाॅक लागून ९ वर्षाच्या मुलाचा मृत्यू
  Next article‘अब की बार गोळीबार सरकार ‘खासदार सुप्रिया सुळे यांचा भाजपावर निक्षाणा

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here