Home क्राईम पुण्यात ऑनलाइन क्रिकेट 🏏 सट्टा घेणा-यां टोळीच्या खंडणी विरोधी पथकाने आवळल्या मुसक्या

    पुण्यात ऑनलाइन क्रिकेट 🏏 सट्टा घेणा-यां टोळीच्या खंडणी विरोधी पथकाने आवळल्या मुसक्या

    217
    0

    पुणे दिनांक १५ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील कोथरूड येथील भुसारी कॉलनी येथील पटेल टेरेस सोसायटी मधील फ्लॅट नंबर ५ मध्ये ऑनलाइन क्रिकेटवर सट्टा घेणा-या टोळीच्या खंडणी विरोधी पथकाने दहा जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत.यात १६ मोबाईल व दोन लॅपटॉप असा एकूण २ लाख २० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

    दरम्यान याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे १) मुकेश कुमार शैलेंद्रप्रसाद साहू ( वय २४) २) देवेंद्र कमलेशकुमार यादव ( वय २१) ३) जसवंत भुषणलाल साहू ( वय २२) ४) राहूलकुमार गणेश यादव   (वय ३०) ५) रोहितकुमार गणेश यादव ( वय २६) ६) दुष्यांत कोमल सिंह सोनकर ( वय २३) ७) संदीप राजु मेश्राम ( वय २१) ८) आखिलेश्वर कृपाराम ठाकूर ( वय २४) ९) मोहम्मद ममनुन इस्माईल सौदागर ( वय ३२ सर्व रा.भिलाई छत्तीसगड) १०) अमित कैलास शेंडगे ( वय ३२ रा. किश्किंकदानगर पौंड रोड कोथरूड पुणे) या प्रमाणे आहे.या प्रकरणी कोथरूड पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून.या प्रकरणी पुढील तपास खंडणी विरोधी पथकाचे स.पो.नि.अभिजित पाटील हे करीत आहेत.सदरची कारवाई अप्पर पोलिस आयुक्त गुन्हे शैलेश बलकवडे.पोलिस उप आयुक्त गुन्हे.अमोल झेंडे.सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे सुनील तांबे.यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक खंडणी विरोधी पथक एकचे क्रांतीकुमार पाटील.यांच्या सुचनेनुसार स.पो.नी.अभिजित पाटील.पो.उप.नि.यशवंत ओंबासे पोलिस अंमलदार प्रविण ढमाळ.अमोल आवाड.मधुकर तुपसौंदर.सजंय भापकर.सयाजी चव्हाण.नितिन कांबळे.दुर्योधन गुरव.राजेंद्र लांडगे.विजय कांबळे.प्रफुल्ल चव्हाण.अमर पवार.संभाजी गंगावणे यांनी केली आहे.

    Previous articleयावर्षी संपूर्ण भारतात १०६ टक्के सरासरी पाऊस हवामान विभागाच्या वतीने वर्तविण्यात आला अंदाज
    Next articleअयोध्येत रामनवमीचा मोठा उत्सव शरयू नदीवर रामभक्तांचा जनसागर दर्शनासाठी मंदिर रात्री अकरा पर्यंत उघडे

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here