Home क्राईम मानमाड ते मालेगाव महामार्गावर खासगी ट्रॅव्हल्स बसचे स्टेरिंगचे राॅड तुटून भीषण अपघातात...

  मानमाड ते मालेगाव महामार्गावर खासगी ट्रॅव्हल्स बसचे स्टेरिंगचे राॅड तुटून भीषण अपघातात ५० प्रवासी गंभीर जखमी

  236
  0

  पुणे दिनांक १५ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार पुण्यातून जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसला आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास मानमाड ते मालेगाव महामार्गावर व-हाणे गावाजवळ बसच्या स्टेरींगचे राॅड तुटल्याने ही बस उलटली या अपघातात बसमधील एकूण ५० प्रवासी हे गंभीर रित्या जखमी झाले आहेत.जखमींना उपचारासाठी मालेगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.या अपघातात सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झालेली नाही.

  दरम्यान या अपघाताबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नुसार ही खासगी ट्रॅव्हल्स कंपनीची बस पुण्यातून नेपाळकडे जात असताना मानमाड ते मालेगाव महामार्गावर व-हाणे गावाजवळ बसचा स्टेरींगचा राॅड तुटल्याने बसच्या चालकाचा ताबा सुटल्याने बस पलटली व अपघात झाला दरम्यान बस पलटी झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी बस मधील प्रवाशांना तातडीने बाहेर काढले व काही जखमींवर घटनास्थळीच उपचार केले तर गंभीर जखमींना मालेगाव येथील मालेगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.आता त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.दरम्यान या अपघातात एक दहा वर्षांच्या मुलाचा हात अडकला होता.जेसीबीच्या सहाय्याने या मुलाची सुटका करण्यात आली आहे.

  Previous articleशेअर्सच्या नावाखाली युवकाची ऑनलाइन द्वारे २४ लाख रुपयांची फसवणूक
  Next articleलोकसभा निवडणुकीच्या पहिल्याच टप्प्यात निवडणूक आयोगाने ४ हजार ६५० कोटी रुपये केले जप्त

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here