Home राजकीय लोकसभा निवडणुकीच्या पहिल्याच टप्प्यात निवडणूक आयोगाने ४ हजार ६५० कोटी रुपये केले...

    लोकसभा निवडणुकीच्या पहिल्याच टप्प्यात निवडणूक आयोगाने ४ हजार ६५० कोटी रुपये केले जप्त

    219
    0

    पुणे दिनांक १५ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान हे दिनांक १९ एप्रिलला आहे. दरम्यान संपूर्ण भारतात पारदर्शक निवडणूकासाठी निवडणूक आयोगाच्या वतीने तयारी पूर्ण झाली आहे.याताच निवडणूक आयोगाच्या वतीने आता पर्यंत ४ हजार ६५० कोटी रुपये जप्त केले आहे.दरम्यान आता पर्यंत मागील ७५ वर्षाच्या इतिहासातील या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक रोकड जप्त करण्यात आली आहे..अशी माहिती निवडणूक आयोगाच्या वतीने देण्यात आली आहे.

    दरम्यान लोकसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाने जप्त करण्यात आलेली रक्कम ही सन २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकी पेक्षा जास्त आहे.यावेळी माध्यमांशी बोलताना निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार लोकसभा निवडणूक आधी १ मार्च पासून रोज १०० कोटी हून अधिक रोकड जप्त करण्यात आली आहे.दरम्यान या जप्तीच्या पथकात फ्लाइंग स्क्वाॅड व संख्याकी निरीक्षण पथकाचा यात समावेश आहे.यात रोकड.दारु.मोफत वस्तू.मादक पदार्थाची कोणत्याही हालचाली व वितरण होणार नाही.याची खात्री करण्यासाठी व्हिडिओ पथक व सीमा चौक्या सतत २४ तास कार्यरत आहेत.दरम्यान लोकसभा निवडणुकीसाठी दिनांक १९ एप्रिल २६ एप्रिल व ७ में १३ में.२० में २५ में व १ जुन या कालावधीत एकूण सात टप्प्यात मतदान होणार असून याचा निकाल हा दिनांक ४ जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे.अशी माहिती निवडणूक आयोगाच्या वतीने अधीच जाहीर करण्यात आली आहे.

    Previous articleमानमाड ते मालेगाव महामार्गावर खासगी ट्रॅव्हल्स बसचे स्टेरिंगचे राॅड तुटून भीषण अपघातात ५० प्रवासी गंभीर जखमी
    Next articleयावर्षी संपूर्ण भारतात १०६ टक्के सरासरी पाऊस हवामान विभागाच्या वतीने वर्तविण्यात आला अंदाज

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here