पुणे दिनांक १५ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील हडपसर येथील हांडेवाडी येथे ऑनलाइन माध्यमातून इन्स्टाग्रामवर मेसेज पाठवून व्हाॅटस अॅप ग्रुप मध्ये अॅड करुन एक लिंक पाठवून त्यात ज्वाइंट होण्यास सांगून सदरच्या युवकाला शेअर्सची माहिती सांगून व त्याला एक अॅप्लीकेशन डाऊनलोड करण्यासाठी सांगून व रजिस्ट्रेशन करण्याकरीता सांगितले व वेगवेगळ्या बॅक खात्यावर पैसे पाठविण्यास सांगितले.व युवकाची तब्बल २४ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. सदरच्या फसवणूक प्रकरणी हडपसर येथील हांडेवाडी येथे रहाणाऱ्या युवकाने वानवडी पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल केल्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर २८९/२०२४ भा.दा.वी.कलम ४१९ व ४२० व माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (ड) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी पुढील तपास वानवडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पंतगे हे करीत आहेत.