Home आध्यामिक अयोध्येत रामनवमीचा मोठा उत्सव शरयू नदीवर रामभक्तांचा जनसागर दर्शनासाठी मंदिर रात्री अकरा...

अयोध्येत रामनवमीचा मोठा उत्सव शरयू नदीवर रामभक्तांचा जनसागर दर्शनासाठी मंदिर रात्री अकरा पर्यंत उघडे

103
0

पुणे दिनांक १७ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज रामनवमी अयोध्येतील भव्य दिव्य अशा राममंदिरात आज रामनवमी साजरी केली जात आहे.त्यामुळे रामल्लाचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून मोठा जनसागर मंगळवारीच मंदिर परिसरात दाखल झाला आहे.दरम्यान मंदिर परिसरात भाविकांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत.पवित्र अशा शरयू नदीवर रामभक्तांनी स्नान करून रामल्लाचे दर्शन घेत आहेत. आज बुधवारी राममंदिरांवर हेलिकॉप्टर द्वारे पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.

दरम्यान आज रामनवमी अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मुख्य प्रवेशद्वारावर आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे.अयोध्येत येणाऱ्या रामभक्तांसाठी योग्य अशा सोईसुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. आज प्रभू श्रीरामांच्या कपाळावर सुर्य किरण पडतील तेव्हा प्रभू श्रीरामाच राजतिलक होणार आहे.दरम्यान आज पहाटे तीन वाजल्यापासून मंदिर प्रशासनाच्या वतीने भाविकांसाठी दर्शनांची व्यवस्था करण्यात आली आहे.रात्री ११ वाजेपर्यंत मंदिर खुले राहणार आहे.अयोध्येत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Previous articleपुण्यात ऑनलाइन क्रिकेट 🏏 सट्टा घेणा-यां टोळीच्या खंडणी विरोधी पथकाने आवळल्या मुसक्या
Next articleकर्जबाजारी मुलाने केली वडिलांची हत्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here