पुणे दिनांक १७ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुणे येथील वारज्यातील बहुली रोडवर खडकवासला धरणाच्या कोपरा काठी जवळ माती घेऊन जाणा-या डंपरला आज बुधवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास अचानकपणे शाॅकसर्किटमुळे कॅबिनला भीषण अशी आग लागली होती.दरम्यान या डंपरला आग लागल्यानंतर ड्रायव्हरने डंपर एका बाजूला घेऊन ड्रायव्हरने गाडी मधून खाली उतरला दरम्यान डंपरला आग लागल्यानंतर दोन्ही बाजूकडून येणारी वाहने काही अंतरावर उभी करण्यात आली होती.दरम्यान या डंपरला लागलेल्या आगीवर नियंत्रण आणण्यात आले.तोपर्यत वाहनांच्या रांगाच रांगा या ठिकाणी लागल्या होत्या.दरम्यान एक घंटा या रोडवरील वाहतूक संपूर्ण बंद होती.