Home क्राईम दाऊद इब्राहिम व छोटा शकील गॅंगकडून एकनाथ खडसे यांना जीवे ठार मारण्याची...

  दाऊद इब्राहिम व छोटा शकील गॅंगकडून एकनाथ खडसे यांना जीवे ठार मारण्याची धमकी राजकीय वर्तुळात एकच खळबळ

  757
  0

  पुणे दिनांक १७ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शरद पवार गटात असलेले विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांना जीवेठार मारण्याची धमकी आली आहे.दरम्यान चार वेगवेगळ्या मोबाईल नंबर वरुन त्यांना फोन करुन ही धमकी देण्यात आली आहे.दरम्यान या धमकी नंतर खडसे यांनी मुक्ताईनगर पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल केली आहे.सदरची धमकी अंडरवर्ल्ड डॉन व मुंबई बॅम्ब स्फोटातील फरार आरोपी दाऊद इब्राहिम व त्याचा साथीदार छोटा शकील गॅंगकडून आल्या नंतर महाराष्ट्राती राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.दरम्यान या पूर्वी देखील या दोघांनी एकनाथ खडसे हे विरोधीपक्षनेते असतानाही त्यांना धमकी आली होती.

  दरम्यान याप्रकरणी अधिकृत सूत्रांनद्वारे मिळालेल्या माहितीनुसार छोटा शकील व दाऊद इब्राहिम हे तुम्हाला जीवे ठार मारणारा आहेत.असे फोनवर धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीने पहिल्या फोनच्या वेळी सांगितले होते.सुरुवातीला एकनाथ खडसे यांनी हा प्रकार गंभीरतेने घेतला नाही. त्या नंतर अन्य नंबर वरुन पुन्हा एकदा त्यांना फोन करुन तुम्हाला सांगितल्या नंतर तुम्ही काहीच हालचाल केली नाही.तुम्हाला हे लोक जीवे ठार मारणार आहेत.दरम्यान खडसे यांना असे एकूण वेगवेगळ्या नंबर वरुन ४ ते ५ वेळा फोन आल्यानंतर एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगर पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल केली आहे.सदरचे धमकीचे फोन हे अमेरिका.व उत्तरप्रदेश व लखनव येथून आले आहेत.दरम्यान या धमकीच्या फोनवरून राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

  Previous articleकर्जबाजारी मुलाने केली वडिलांची हत्या
  Next articleसहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाला १० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here