Home राजकीय उपमुख्यमंत्री अजित पवार व सुनेत्रा पवार यांनी सकाळी केली दगडूशेठ गणपतीची आरती

    उपमुख्यमंत्री अजित पवार व सुनेत्रा पवार यांनी सकाळी केली दगडूशेठ गणपतीची आरती

    1099
    0

    पुणे दिनांक १८ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज आज बारामती लोकसभा उमेदवार सुनेत्रा पवार आज दाखल करणार असून आज गुरुवारी सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार व सुनेत्रा पवार यांनी आज सकाळीचा पुण्यातील नवसाचा गणपती दगडुशेठ गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन आरती केली आहे. दरम्यान यावेळी पहिल्यांदाच नणंद भावजया एकमेकांच्या विरोधात बारामती लोकसभा मतदारसंघात निवडणूक साठी उभ्या आहेत.त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात चुरशीची निवडणूक होणार आहे. दरम्यान दगडूशेठ गणपती बाप्पाचे दर्शन व आरती केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे माध्यमांशी बोलताना म्हणाले की.लोकसभा निवडणूका चांगल्या वातावरणात पार पडाव्यात तसेच राज्यात सर्वत्र महायुतीचे उमेदवार चांगल्या मतांनी निवडून येण्यासाठी नवसाचा गणपती दगडुशेठ बाप्पाला प्रार्थना केली आहे.तसेच जनता जनार्दनाचा निर्णय आम्हाला मान्य असेल असे ते म्हणाले.

    Previous articleपुण्यात अवकाळी पाऊस वाघोली खराडीत गारांचा पाऊस वाघोलीत होर्डिंग्ज कोसळले
    Next articleपुण्यात गोळीबाराचे सत्र सुरूच काडीपेटी मागण्या वरुन एकावर आज पहाटे गोळीबार लागोपाठ तिसरी घटना

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here