Home क्राईम पुण्यात गोळीबाराचे सत्र सुरूच काडीपेटी मागण्या वरुन एकावर आज पहाटे गोळीबार लागोपाठ...

  पुण्यात गोळीबाराचे सत्र सुरूच काडीपेटी मागण्या वरुन एकावर आज पहाटे गोळीबार लागोपाठ तिसरी घटना

  1062
  0

  पुणे दिनांक १८ एप्रिल ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मागील तीन दिवसांपासून पुण्यात रोज एक गोळीबाराची घटना घडत असल्याने आता पुण्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.व दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.आज पहाटे सिंहगड पोलिस स्टेशनच्या हद्दीत भूमकर चौकात गोळीबार झाल्याची घटना घडली आहे.यात एकाच्या खांद्याला गोळी चाटून गेली आहे.दरम्यान काडीपेटी मागितली म्हणून एका अज्ञात व्यक्तीने दुसऱ्यावर गोळीबार केला आहे.

  दरम्यान याप्रकरणी पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज गुरुवारी पहाटे २.३० वाजण्याच्या सुमारास सिंहगड पोलिस स्टेशनच्या हद्दीत भूमकर चौकात गणेश गायकवाड ( रा.वारजे पुणे) यांने एकाकडे काडीपेटी मागितली म्हणून अज्ञात व्यक्तीने गणेश यांच्यावर गोळीबार केला यात गोळी गणेश यांच्या खांद्याला गोळी लागली असून यात तो जखमी झाला आहे.दरम्यान यापूर्वी जंगली महाराज रस्त्यावर अरगडे हाईट्स येथे काम करुन घरी जाताना बजाज पल्सर वरुन आलेल्या दोन अज्ञात व्यक्तीने गाडीजवळ येऊन दिनेश अरगडे ( वय ३८ रा.खडकी पुणे) यांच्या वर पिस्तूल मधून गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला.परंतू पिस्तूल काॅक करत गोळीबार करण्याचा प्रयत्न केला.यावेळी अरगडे यांनी आरडाओरडा केला.व दोन हल्लेखोर हे पसार झाले.तर दुसरी घटना ही पुणे सोलापूर महामार्गावर हडपसर शेवाळेवाडी येथे घडली असून.या घटनेत भरदिवसा सिक्युरिटी एजन्सी वादातून एका माजी सैनिकाने दुसऱ्या माजी सैनिक यांच्यावर गोळीबार केला.यात माजी सैनिक जयवंत बापुराव खलाटे ( वय ५३ रा.भेकराई नगर पुणे.मुळ या.बारामती ) हे जखमी झाले तर या गोळीबार प्रकरणी पोलिसांनी सुधीर रामचंद्र शेंडगे ( वय. ५३ रा.गोंधळेनगर पुणे.मुळ रा.भोर) या माजी सैनिकला अटक केली आहे.त्यांने परवाना धारक पिस्तूल मधून गोळीबार केला होता.या बाबत हडपसर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर आज पहाटे २.३० वाजण्याच्या सुमारास सिंहगड पोलिस स्टेशनच्या हद्दीत भूमकर चौकात गणेश गायकवाड यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे.लागोपाठ एकामागोमाग एक अशा तीन घटना पुणे शहरात गोळीबाराच्या घटनेने पुणे हादरले आहे.व आता शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात रोज गोळीबाराच्या घटनेने आता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

  Previous articleउपमुख्यमंत्री अजित पवार व सुनेत्रा पवार यांनी सकाळी केली दगडूशेठ गणपतीची आरती
  Next articleबाॅलिवृडचा सुपर स्टार सलमान खानच्या निवासस्थांनावर गोळीबाराचे पुणे कनेक्शन गोळीबार प्रकरणी पुण्यातून आवळल्या दोघांच्या मुसक्या

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here