Home राजकीय बारामती लोकसभा निवडणुकीची चर्चा सात समुद्रापार.अमेरिकावरुन पत्रकार बारामतीत दाखल

    बारामती लोकसभा निवडणुकीची चर्चा सात समुद्रापार.अमेरिकावरुन पत्रकार बारामतीत दाखल

    660
    0

    पुणे दिनांक २० एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) बारामती लोकसभा निवडणूक सर्वात चर्चेचा मोठ्या प्रमाणावर विषय झाला आहे. दरम्यान या पवार कुटुंबातील या नणंद भावजया यांची लढत ही खूप गाजली असून त्याची चर्चा आता भारत देशापूरती राहिली नसून ती आता समुद्रापार अमेरिकेत पोहोचली आहे.याचे कारण देखील तसेच आहे. दरम्यान यासंदर्भात लोकसभा उमेदवार सुप्रिया सुळे यांनीच ही माहिती दिली आहे.बारामती लोकसभा निवडणूक कव्हर करण्यासाठी अमेरिका मधून पत्रकार आले आहेत असे त्यांनी सांगितले आहे.

    दरम्यान याप्रकरणी भाषणात बोलताना लोकसभा उमेदवार सुप्रिया सुळे यांनी या लढतीची माहिती दिली आहे.त्यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की बारामती लोकसभा मतदारसंघाची हवा संपूर्ण जगभरात आहे.त्यामुळे संपूर्ण देशभरातून पत्रकार येत असून न्यूयॉर्कवरुन देखील पत्रकार आले आहेत.न्यूयाॅर्क टाईम्सचे पत्रकार बारामतीत तळ ठोकून आहेत.तसेच संपूर्ण देशभरातून फोटोग्राफर आले आहेत.म्हणजे जेष्ठ नेते शरद पवार हे जिल्हा राज्य.देश नव्हे तर सात समुद्रापार अमेरिकेपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे ख-या अर्थाने हनुमानच पावला आहे.त्यापेक्षा वेगळे काय हवे? दरम्यान पुढे बोलताना सुळे म्हणाल्या की ही एक वैचारिक लढाई आहे. संपूर्ण मतदार संघात फिरावे लागत असल्याने बारामतीत कमी वेळ देते आहे.परंतू बारामतीकर ते संभाळणार आहे.दरम्यान ग्रामपंचायतीपासून लोकसभापर्यत प्रत्येक निवडणुक वैचारिक लढाईने लढणार आहे.ही वैयक्तिक लढाई नाही.मी अमोल कोल्हे एका विचाराने लढत आहेत.असे त्यांनी म्हटले आहे.

    Previous articleबांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी यांच्या घरावर सकाळीच ‘ईडी ‘ ची छापेमारी
    Next articleदेहूरोड येथे कोयत्यासह एकाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here