Home फायर पुणे ते मुंबई महामार्गावर व-हाडाच्या बसला भीषण 🔥 आग बस आगीत जळून...

पुणे ते मुंबई महामार्गावर व-हाडाच्या बसला भीषण 🔥 आग बस आगीत जळून पूर्णपणे खाक

316
0

पुणे दिनांक २१ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार मुंबई ते पुणे महामार्गावर भीषण अग्नीतांडवची घटना घडली आहे.या भीषण घटनेत लग्नाच्या व-हाडाच्या  बसला भीषण आग 🔥 लागली आहे.आज पहाटे रात्री दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना रायगड जिल्ह्यातील खोपोली जवळ घडली आहे.बस पेटल्या नंतर बस मधील व-हाडी मंडळी जीव वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आरडाओरडा करत होते.

दरम्यान याप्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही बस लग्नाच्या व-हाडाची होती अशी प्रथम दर्शनी माहिती मिळत आहे.या बस मध्ये एकूण ४२ प्रवासी होते.मध्यरात्रीच्या सुमारास दोन वाजण्याच्या सुमारास रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे या बसला अचानकपणे आग लागली. या घटनेनंतर बस मधील व-हाडी प्रवासी यांच्या मध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले.व आपला जीव वाचवण्यासाठी ते आरडाओरडा करायला लागले.दरम्यान ही बस मुंबई वरून सोलापूरच्या दिशेने जात होती. बसला आग लागल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान व महामार्ग पोलिस व डेल्टा फोर्स यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली यांनी तातडीने बचाव कार्य करुन बस मधील सर्व प्रवाशांना बाहेर काढून आहे.यात ही बस संपूर्ण पुणे जळून खाक झाली आहे.परंतू यात सुदैवाने कोणतीही प्रकारची जीवीतहानी झालेली नाही.

Previous articleअक्कलकोट येथे अवकाळी पावसाने नदीनाल्यांना आला पूर वाहतूक व्यवस्था ठप्प
Next articleलग्नं समारंभ उरकून घरी परततांना व्हॅनला भीषण अपघात ९ जणांचा मृत्यू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here