पुणे दिनांक २२ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार कोल्हापूर शहरातील जवाहर नगर येथे गोळीबाराची घटना घडली आहे.यात यादव काॅलनी मधील वाद शौकत मुजावर (वय २३ रा.कोल्हापुर) हा युवक गंभीर रित्या जखमी झाला आहे. दरम्यान या गोळीबार प्रकरणी पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार मुजावर हे जेवण करून रात्रीच्या वेळी बाहेर फिरायला आले असता दुचाकी व चारचाकी मधून आलेल्या ६ ते ७ जमावाने त्यांच्या दिशेने गोळीबार केला.यात दोन राऊंड हवेत उडाले तर एक गोळी मांडीत घुसली आहे.त्यांना तातडीने उपचारासाठी रूग्णांलयात दाखल करण्यात आले आहे.दरम्यान गोळीबार करुन हे आरोपी फरार झाले आहेत.या गोळीबार प्रकरणी कोल्हापूर पोलिस हे आरोपींचा शोध घेत आहेत.