पुणे दिनांक २२ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार पुण्यातील प्रसिद्ध असलेल्या भोरी आळीत आज सोमवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास तीन मजली इमारतीला अचानकपणे आग लागली आहे.दरम्यान या आगीने थोड्याच वेळात रौद्र रूप धारण केले आहे.आग लागल्यानंतर नंतर या भागातील नागरिकांनी आरडाओरडा केल्याने इमारती मधील रहिवासी हे घराबाहेर पडले. दरम्यान या आगीची कल्पना पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाला दिल्या नंतर घटनास्थळी तातडीने सहा अग्निशमन दलाचे बंब पोहोचले आहेत.
दरम्यान या आगीच्या घटनेत सुदैवाने कोणतीही प्रकारची जीवीतहानी झालेली नाही.अशी प्रथम प्राथमिक माहिती मिळत आहे.दरम्यान सध्या आता अग्निशमन दलाच्या जवान आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहे.