पुणे दिनांक २३ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार पुणे जिल्ह्यातील मुठा येथे पुणे गुन्हे शाखेचे पोलिस व सराईत गुन्हेगारामध्ये गोळीबार झाला असून यात पोलिसांनी फरार असलेल्या सराईत गुन्हेगारा नव्या वाडकर यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.त्यांने पोलिसांवर त्यांच्या कडील रिव्हालवर मधून पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला.त्याला प्रत्यूत्तर म्हणून पोलिसांनी देखील तीन राऊंड फायर केले.तो पळून जात असताना पोलिसांनी त्याचा पाठलाग करत त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.अनेक दिवसांपासून तो फरार होता.त्याच्या मागावर पोलिस होते.
दरम्यान या बाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांना खबर मिळाली होती की फरार आरोपी नव्या वाडकर ( वय १८ ) हा पुणे जिल्ह्यातील मावळ तालुका येथील मुठा गावात असल्या बाबत माहिती गुन्हे शाखा खंडणी विभाग दोनचे पोलिस पथक हे त्याला पकडण्यासाठी गेले असता त्यांने पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला.या गोळीबाराला प्रत्यूत्तर म्हणून पोलिसांनी त्यांच्या दिशेने तीन राऊंड फायर केले.त्याचा पाठलाग करत त्याला अटक केले आहे.नव्या हा सराईत गुन्हेगार असून त्याचावर खंडणी तसेच खूनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे दाखल असून एकूण सात गुन्हे दाखल आहेत.त्याचे जनता वसाहत मध्ये परिसरात वर्चस्व निर्माण केले आहे.