Home राजकीय धाराशिव मध्ये भाजपला खिंडार लोकसभा निवडणूक पूर्वीच ठाकरे गटाचा मोठा नेता परत...

  धाराशिव मध्ये भाजपला खिंडार लोकसभा निवडणूक पूर्वीच ठाकरे गटाचा मोठा नेता परत येणार

  64
  0

  पुणे दिनांक २४ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्रात सर्वत्र लोकसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरू आहे.अशातच काही नेते मंडळी लोकसभेची उमेदवारी न मिळाल्याने नाराज आहेत.त्यामुळे या नाराजीने अनेक नेते मंडळी पक्ष बदलत आहे.दरम्यान उमेदवारी मिळणार म्हणून भारतीय जनता पार्टीत गेलेला नेता पून्हा शिवसेना उध्वव बाळासाहेब ठाकरे गटात स्वगृही परतणार असल्याने आता भाजपला धाराशिव मध्ये खिंडार पडणार आहे.दरम्यान धाराशिवचे माजी खासदार व भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष शिवाजीराव बापू कांबळे हे पून्हा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटात त्यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश करणार आहेत.

  दरम्यान अशी माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे.कैलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली माजी खासदार शिवाजीराव कांबळे व अनेक भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे व पदाधिकारी हे ठाकरे गटात पक्षप्रवेश करणार आहेत.दरम्यान भोकर येथे आज ऊध्दव ठाकरे यांची पत्रकार परिषद होणार आहे.व यावेळी शिवाजीराव कांबळे पक्षप्रवेश करणार आहेत.ते दोन टर्म शिवसेनेचे खासदार राहिले आहेत.त्यांनी नुकताच भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश केला होता.त्या नंतर ते परत एकदा शिवसेना उध्वव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटात स्वगृही परतणार आहेत.त्यामुळे आता भारतीय जनता पार्टीला धाराशिव मध्ये मोठे खिंडार पडणार आहे.दरम्यान यापूर्वी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीला माढा लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर धक्का बसला आहे.या मतदार संघा मधून धैर्यशील मोहिते पाटील हे इच्छूक उमेदवार होते.परंतू भारतीय जनता पार्टीने रणजितसिंह निंबाळकर यांना पून्हा दुसऱ्यांदा संधी दिल्याने धैर्यशील मोहिते पाटील यांनी भारतीय जनता पार्टीला जय श्रीराम करुन राजीनामा दिला आहे.शरद पवार गटात पक्ष प्रवेश केला आहे.व धैर्यशील मोहिते पाटील हे महाविकास आघाडीतून माढा लोकसभा निवडणूक लढवित आहेत.त्या मुळे माढा लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीला मोठ्या प्रमाणावर खिंडार पडले आहे.

  Previous articleपुण्यात नाकाबंदीत २७ लाखांची रोकड व गाडी पोलिसांनी केली जप्त
  Next articleमध्य रेल्वेची वाहतूक व्यवस्था कोलमडली.कल्याणकडे जाणाऱ्या प्रवाशांचे हाल

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here